शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:59 IST

काळजाच्या तुकड्याची ताटातूट अन् आनंदाश्रूत झाली पुन्हा भेट

दत्ता पाटीलतासगाव : अवघ्या अडीच वर्षांचा शंभू. तासगाव तालुक्यातील पाडळी गावच्या शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचा मुलगा. वडिलांसोबत शेतात गेला. वडील कामात असतानाच नकळत दिसेनासा झाला. शोध घेण्यासाठी बघता बघता गावच्या पोलिस पाटलांपासून ते जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांपर्यंत मोठी यंत्रणा कार्यरत झाली. पंचक्रोशी धावून आली. मात्र तब्बल दोन दिवस, तीन रात्री शोध घेऊनही शंभूचा सुगावा लागला नाही.मात्र, अनपेक्षितपणे तब्बल ६३ तासांनंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता शंभू छोट्याशा म्हसोबा मंदिरात सापडला. पोटच्या काळजाच्या तुकड्याची ताटातूट झालेल्या आई-वडिलांना शंभू मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.तासगाव तालुक्याच्या दक्षिण टोकाला डोंगराच्या पायथ्याशी सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव असणाऱ्या पाडळीत शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचे एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबात शशिकांत पाटील आणि त्यांच्या भावांची मिळून पाच लहान मोठी मुले आहेत. गावालगत असणाऱ्या शेतात हे कुटुंब राहण्यास आहे. शेताजवळूनच ओढा गेला आहे. हा ओढा सध्या भरून वाहत आहे. नकळतपणे मुले ओढ्याकडे जाऊ नयेत, म्हणून अडीच वर्षांच्या चिमुकल्या शंभूला सोबत घेऊन शनिवारी शशिकांत पाटील काही अंतरावरील दुसऱ्या शेतात जनावरे घेऊन गेले होते.

मात्र, सायंकाळी शेतात खेळणारा शंभू अचानक गायब झाला. नातेवाइकांनी शोध घेतला. शंभू सापडत नसल्याची बातमी गावात गेली. नातेवाइकांसह सुमारे शंभरहून अधिक गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली. अखेर रात्री पोलिसांना ही बातमी कळविण्यात आली. पोलिसांची पथक ही घटनास्थळी आले. आणखी शोधमोहीम राबवली; पण शंभूचा शोध लागला नाही.आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रूधारा थांबेनात. शंभूच्या शोधात रात्र जागून काढली. सकाळी पुन्हा गावकरी शोधमोहिमेत सहभागी झाले. पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांनी तळ ठोकला. श्वान पथक मागवण्यात आले. दिवसभर पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. तरीही शंभूचा शोध लागला नाही.सोमवारी पुन्हा शोध सुरू झाला. सांगलीतून जिल्हा पोलिस प्रमुख आले. रेस्क्यू पथक बोलवण्यात आले. ओढ्यासह आजूबाजूतील आठ ते दहा विहिरींचा तळ गाठून शंभूचा शोध घेतला. मनात चुकणाऱ्या शंकेची पाल प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती. सोमवारची रात्रही तशीच तळमळत गेली.आई,-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू मंगळवारची सकाळ मात्र शंभूच्या कुटुंबीयांना दिलासा देणारी ठरली. शंभू हरवलेल्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचे लिपिक नेताजी पाटील यांच्या शेतालगत छोट्याशा म्हसोबा मंदिरातच शंभू बसल्याचे नेताजी यांना दिसले. त्यांनी प्रशासनासह कुटुंबीयांनाही माहिती दिली. शंभूच्या वडिलांसह नातेवाईक घटनास्थळी आले. वडिलांनी त्याला पटकन कडेवर घेतले. आई,-वडिलांच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू पाहून गावकऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.