शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देणार, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:06 IST

कवलापुरात मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक

सांगली : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीनमोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाही. अधिकाऱ्यांनी बळाचा वापर केल्यास प्रसंगी त्यांना चोप देण्यात येईल, असा इशारा शक्तिपीठ महामार्गबाधितशेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला आहे.शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी दि. २५ जुलै रोजी अधिकारी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी रणनीती ठरवण्याकरिता कवलापूर (ता. मिरज) येथे बैठक घेतली. या बैठकीत दिगंबर कांबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.दिगंबर कांबळे म्हणाले, जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ येथील शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी अनेक गावांत मोजणी रोखून मोजणी अधिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. मिरज तालुक्यातील शेतकरीही जमिनी देणार नाहीत. कवलापूर येथील बैठकीत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.दि. २५ जुलैपासून कवलापूर येथे शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू होणार आहे. या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकलून देण्यात येणार आहे. जमीनमोजणीसाठी न येण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तरीही मोजणीसाठी अधिकारी येणार असतील, तर त्यांना बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागेल.

राज्यातील १२ जिल्ह्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध : शरद पवारशक्तिपीठ महामार्गाला राज्यातील १२ जिल्ह्यांतील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये. रत्नागिरी - नागपूर महामार्गाचे सहापदरी भूसंपादन केले आहे. त्या शासकीय जमिनीचा वापर करून रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरळक वर्दळ वाढवावी. तोट्यात गेलेल्या त्याच महामार्गाला जीवदान देऊन शक्तिपीठ महामार्गामधील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन आणि उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्कप्रमुख शरद पवार यांनी केली.