शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

प्लेगची लस घेणाऱ्यांना शाहू महाराजांनी दिली होती बक्षिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 15:22 IST

सांगली : 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १२५ वर्षांंपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. प्लेगची लस ...

ठळक मुद्देप्लेगची लस घेणाऱ्यांना शाहू महाराजांनी दिली होती बक्षिसे प्रा. डॉ. विलासराव पोवार यांचे विवेचन

सांगली : 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १२५ वर्षांंपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. प्लेगची लस प्रथम स्वत: टोचून घेतली, लस घेणाऱ्यास रजा, रोख बक्षिसे जाहीर केली. याचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. विलासराव पोवार यानी केले.

मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी प्रशासन, प्रबोधन, आरोग्य, उपचार, आर्थिक मदत, पुर्नवसन यांचा मेळ साधत शास्त्रशुद्ध उपाययोजना राबवल्या, त्यामुळे प्लेगच्या संकटावर मात करता आली असे डॉ. पोवार म्हणाले.अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ऑनलाईन अंक प्रकाशनावेळी डॉ. पवार बोलत होते.

'प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य' या विषयावर विवेचन केले. पत्रकार विजय चोरमारे अध्यक्षस्थानी होते. डॉ. पोवार म्हणाले, महाराजांनी रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारन्टाईन केले. अपंग, दिनदुबळे व गरजूंसाठी अन्नदान सुरु केले. मजुरांना रोजगार दिला.

यात्रा-जत्रा व उत्सवांवर बंधने घातली. साठेबाजी व महागाई करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले. प्लेगने मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन दिले. जनतेचे दागदागिने, मौल्यवान वस्तू राजदरबारातील तिजोरीत सुरक्षित ठेवण्याची सोय केली.पोवार यांनी सांगितले की, महाराजांनी लोकानुनय न करता प्लेग निर्मूलनासाठी शास्त्रीय उपायांची कठोर अंमलबजावणी केली. त्यांचा प्लेगविरोधी जाहीरनामा, करवीर सरकारचे गॅझेट व वेळोवेळी काढलेल्या अधिकृत हुकुमांच्या आधारे प्लेगमधील कामांंची माहिती मिळते.

यावेळी चोरमारे यांच्याहस्ते अंनिस वार्तात्राच्या जूनच्या अंकाचे प्रकाशन झाले. चोरमारे यांनी शाहू महाराज व आजच्या राज्यकर्त्यांमध्ये तुलना केली. संयोजन अनिल चव्हाण, मधुकर गायकवाड, राहुल थोरात आदींनी केले.टाळ्या आणि थाळ्यांची भंपकगिरी चोरमारे म्हणाले, आजचे राज्यकर्ते टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा असे भंपक व अवैज्ञानिक कार्यक्रम करत आहेत. महाराजांनी टीका करणाऱ्या वृत्तपत्रांनाही मोठ्या मनाने मदत केली, मात्र आजचे राज्यकर्ते माध्यमांची मुस्कटदाबी करताहेत. शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास केल्यास त्यांना मार्ग सापडेल".

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhistoryइतिहासkolhapurकोल्हापूरSangliसांगलीShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती