गणिताच्या वर्गात शाहिद-प्रियांकाचा रोमान्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:17+5:302021-08-25T04:31:17+5:30
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गणिताचा ऑनलाईन वर्ग सुरू आहे आणि मध्येच शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्राच्या रोमान्सचा ...

गणिताच्या वर्गात शाहिद-प्रियांकाचा रोमान्स
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणिताचा ऑनलाईन वर्ग सुरू आहे आणि मध्येच शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्राच्या रोमान्सचा व्हिडिओ दिसू लागला, तर विद्यार्थ्यांची अवस्था काय होईल?
कल्पनाही करता येणार नाही, असे अनुभव स्वत: विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही घेत आहेत. ऑनलाईन शिक्षणादरम्यान अनेक ठिकाणी व्हायरल घुसखोरीद्वारे भलतेच व्हिडीओ आणि चित्रे मोबाईल स्क्रिनवर विद्यार्थ्यांना दिसू लागली आहेत.
बॉक्स
शाळांनी अधिकृत ॲप वापरावे
शासनाने ऑनलाईन शिक्षणासाठी दीक्षा ॲप उपलब्ध करून दिले आहे. अध्यापनासाठी शाळांनी याच ॲपचा वापर करावा, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. खासगी व्यावसायिक ॲप वापरू नयेत किंवा फिल्टरसह वापरावेत, असेही सांगितले आहे.
बॉक्स
पालकांनो, मुलांच्या `शाळे`वर लक्ष ठेवा
ऑनलाईन शिक्षणाचे दोन-चार तास झाल्यानंतरही मुले मोबाईलवर खेळत असतात. या स्थितीत पालकांची जबाबदारी वाढते. मुले काय पाहताहेत, याकडे लक्ष ठेवणे ही पालकांचीच जबाबदारी ठरते.
बॉक्स
डोक्याला होईल नसता ताप!
पालकांच्या स्मार्टफोनमधून मुलांनी अत्यंत महागडे गेम डाऊनलोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही उपद्व्यापी विद्यार्थ्यांनी भर ऑनलाईन वर्गातच आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याचे प्रकारही शिक्षकांनी अनुभवले आहेत.
कोट
पालकहो, मुलांचे रक्षणकर्ते व्हा
ऑनलाईन शिक्षणाच्या काळात पालकांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. मुले मोबाईलवर काय शिकतात, पाहतात, काय डाऊनलोड आणि अपलोड करतात, यावर पालकांचे काटेकोर लक्ष हवे. यू ट्युब, गुगल क्रोमची हिस्ट्री वारंवार तपासली पाहिजे.
- विनायक राजाध्यक्ष, सायबर तज्ज्ञ