सावळीत पोषण परसबाग पंधरवडा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:17+5:302021-07-01T04:19:17+5:30
कोरोना साथीच्या काळात प्रत्येक कुटुंबाला आपल्या परड्यात लावलेला भाजीपाला घरी खाता येईल. रसायने फवारणी न करता सेंद्रिय पद्धतीने व ...

सावळीत पोषण परसबाग पंधरवडा उपक्रम
कोरोना साथीच्या काळात प्रत्येक कुटुंबाला आपल्या परड्यात लावलेला भाजीपाला घरी खाता येईल. रसायने फवारणी न करता सेंद्रिय पद्धतीने व एका कुटुंबाला पुरेशी परसबाग तयार करण्याचा पोषण परसबागेचा उद्देश आहे. भाज्यांवर रसायने वापरल्याने लहान बालकांना आजार होतात. महिलांमध्ये कर्कराेगाचे वाढते प्रमाण रोखण्याच्या उद्देशाने राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक प्रवीण खाडे, वंदना मोहिते, रूपाली साळुंखे, संपदा शिंदे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुनीता माळी, राधिका सावंत, लता भंडारे, रुचिका सावंत, अंजली माळी व मदन मोहिते यांच्या सहकार्याने परसबाग तयार केली. परसबाग कशी तयार करायची याची माहिती प्रभाग समन्वयक प्रवीण खाडे, वंदना मोहिते यांनी महिलांना दिली.