तांदुळवाडीच्या उपसरपंचपदी शाेभा कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:10+5:302021-02-11T04:28:10+5:30
तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा रमेश कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तांदुळवाडी (ता. वाळवा) ...

तांदुळवाडीच्या उपसरपंचपदी शाेभा कांबळे
तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा रमेश कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. सरपंचपद लोकनियुक्त आहे तर उपसरपंचपद हे पाच सदस्यांसाठी प्रत्येकी एक वर्षाचे असे ठरविण्यात आले आहे. गतवर्षी अश्विनी प्रदीप जाधव या उपसरपंचपदावर विराजमान होत्या. मात्र त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर सरपंच रमेश पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची ग्रामसेवक व निवडणूक निर्णय अधिकारी सतीश गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली. यावेळी शोभा रमेश कांबळे यांनी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविराेध निवड करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी गांव तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव पाटील. पोलीस पाटील वैशाली राजाराम पाटील राजाराम पाटील व सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : १० शाेभा कांबळे