शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

 तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आटपाडी तालुक्यातील तीन युवकांना अटक

By हणमंत पाटील | Updated: January 3, 2024 19:43 IST

तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे.

आटपाडी: आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते. दिनांक २७ डिसेंबर रोजी फिरायला जाऊया असे सांगत सकाळी दहा वाजेच्या सुमारास आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतले. तेथून त्यांना कौठुळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे.

मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. पीडित मुलींना घेऊन आटपाडी पोलिस ठाणे गाठले. संशयित पांडुरंग यमगर, सुभाष यमगर, किरण शेंडगे यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत. दरम्यान, आटपाडी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे. संबंधित लॉज मालकाचीही चौकशी सुरू केली आहे. त्याच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ