शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: August 15, 2014 00:24 IST2014-08-14T23:03:06+5:302014-08-15T00:24:31+5:30

सांगलीतील घटना : संशयितास अटक

Sexual harassment on school children | शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार

शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार

सांगली : येथील शामरावनगरमधील बारा वर्षांच्या शाळकरी मुलास दारू पाजून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पांडुरंग श्रीरंग कोळी (वय ४८, रा. रामनगर चौथी गल्ली, कोल्हापूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
संशयित कोळी हा एका बँकेत रखवालदाराचे काम करतो, तर मुलगा शामरावनगरमधील महसूल कॉलनीत राहतो. कोळीची या मुलाशी ओळख आहे. काल (बुधवार) दुपारी कोळीने त्याला, माझ्या घरातून दुचाकीवरुन साहित्य आणायचे आहे, यासाठी तुझी मदत हवी आहे, असे सांगून स्वत:च्या घरी नेले. तिथे या मुलास त्याने दारू पाजली. त्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगा सायंकाळी घरी गेला असता, त्याच्या तोंडातून दारूचा वास आल्याने नातेवाईकांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने घडलेला हा प्रकार सांगितला.
रात्री उशिरा नातेवाईकांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कोळीला तातडीने अटक केली. आज (गुरुवार) दुपारी त्याला न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या मुलाची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
शहरात दुसरी घटना
चार दिवसांपूर्वी शिवोदयनगर येथे बालिकेवर झालेला अत्याचाराची घटना ताजी असतानाच, शामरावनगरमध्ये बुधवारी हा प्रकार घडला. याबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Sexual harassment on school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.