सांगलीत गटारीचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:14+5:302021-09-03T04:27:14+5:30
याबाबत नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रामनगर गल्ली नं. ...

सांगलीत गटारीचे काम बंद पाडले
याबाबत नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रामनगर गल्ली नं. ६ मध्ये आर. सी. सी गटारीचे १२ लाख रुपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे. संपूर्ण गल्लीची लांबी ६०० मीटर असताना महानगरपालिकेने ३०० मीटरचे काम मंजूर केले.
अर्ध्या भागातच गटार केल्यामुळे वरून येणारे सांडपाणी निचरा कसे होणार, असा सवाल येथील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. काम पूर्ण लांबीने झाले तरच सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. संबंधित ठेकेदाराने तरीही काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता किंवा अन्य अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे नागरिकांनी काम बंद पाडले. यावेळी परिसरातील विशाल कुंभार, संदीप लोणारी, दिलीप पवार, दगडू शिंदे, शुभम शिंदे, सुदाम कुंभार, सचिन कुंभार, दत्तात्रय मेंडुगले, हुसेन मुल्ला, मारुती डांगे, उमेश डांगे, गणेश पोरे, अक्षय कापडेकर, कुमार कोळी, शशिकांत घायाळकर, धनाजी पोतदार आदी उपस्थित होते