विट्यात गुटख्यासह सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST2021-01-09T04:21:08+5:302021-01-09T04:21:08+5:30

याप्रकरणी प्रमोद ऊर्फ रोहित महादेव तहसीलदार (२०, रा. सदलगा, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, सध्या रा. तात्यासाहेब मळा, माधनवगर) व ...

Seventy-one lakh items including gutkha seized in Vita | विट्यात गुटख्यासह सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

विट्यात गुटख्यासह सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी प्रमोद ऊर्फ रोहित महादेव तहसीलदार (२०, रा. सदलगा, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, सध्या रा. तात्यासाहेब मळा, माधनवगर) व तानाजी वसंत शिंदे (४१, रा. तळेवाडी-करगणी, ता. आटपाडी, सध्या रा. माधवनगर, सांगली) या दोघांना अटक केली.

माधवनगर येथील संशयित तहसीलदार व शिंदे हे दोघेजण शुक्रवारी पहाटे ४ वाजता मोटारीतून (क्र. एमएच -१०-बीए-११४४) गुटखा विक्रीसाठी विट्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना मिळाली. यानंतर उपअधीक्षक अकुंश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली.

त्यावेळी पहाटे सव्वाचार वाजता स्काॅर्पिओ गाडी येताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली. यावेळी गाडीत ५ लाख २७ हजार ४०० रुपयांचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा सापडला. त्यामुळे पोलिसांनी ६ लाख रुपयांची गाडी व ५ लाख २७ हजार ४०० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम. टी. मल्याळकर, सुजीत देवराय, अमर सूर्यवंशी, नवनाथ देवकाते, पुंडलिक कुंभार, अभिजित वाघमोडे, रवींद्र पवार, गणेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

१) फोटो - ०८०१२०२१-विटा-प्रमोद ऊर्फ रोहित तहसीलदार, संशयित.

२) फोटो - ०८०१२०२१-विटा-तानाजी शिंदे, संशयित.

Web Title: Seventy-one lakh items including gutkha seized in Vita