शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सांगली महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 10:26 IST

Seventh pay, Muncipal Corporation,Employee, sanglinews गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश मंगळवारी महापालिका कार्यालयाला प्राप्त झाले. या वेतन आयोगाचा लाभ कायम १६४० कायम कर्मचाऱ्यासह २०३० पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर पालिकेच्या तिजोरीवर दरमहा साडेतीन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू शासनाचा आदेश : कायम १६४० कर्मचाऱ्यांना लाभ

सांगली : गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश मंगळवारी महापालिका कार्यालयाला प्राप्त झाले. या वेतन आयोगाचा लाभ कायम १६४० कायम कर्मचाऱ्यासह २०३० पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर पालिकेच्या तिजोरीवर दरमहा साडेतीन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.महापालिकेने १२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या महासभेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव केला होता. माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांनी हा प्रस्ताव दिला होता. तो एकमताने मंजूर करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २ ऑगस्ट २०१९ रोजी वेतन आयोग लागू करण्याच्या कार्यपद्धतीबाबत निर्णय घेत राज्यातील महापालिकांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. अखेर वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर शासनाने वेतन आयोग लागू करण्याचे आदेश मंगळवारी दिले.पाच ते 20 हजार रुपयांची वाढमहापालिकेकडे २३७७ मंजूर पदे आहेत. त्यापैकी १६४० कायम कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यासह २०३० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोग लागू होणार आहे. १ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच ते २० हजार रुपयांची वाढ होणार आहे.कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट : कोरेमहापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सत्ताधारी भाजपने गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांच्या आदेशाने महापालिकेने ठराव केला होता. त्यानुसार राज्य शासनने १ नोव्हेंबरपासून सातवा वेतन आयोगा देण्याची सूचना केली आहे.

यामुळे कर्मचार्‍यांना दिवाळी भेट मिळाली आहे, असे स्थायी सभापती पांडूरंग कोरे यांनी सांगितले. यावेळी गटनेते युवराज बावडेकर, उपमहापौर आनंदा देवमाने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक सुब्राव मद्रासी उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीEmployeeकर्मचारी