महापालिकेकडून सव्वादोनशे फलक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:40+5:302021-01-14T04:21:40+5:30
सांगली : शहरात विनापरवाना फलक लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. आतापर्यंत २२४ बेकायदा फलक जप्त करण्यात आले ...

महापालिकेकडून सव्वादोनशे फलक जप्त
सांगली : शहरात विनापरवाना फलक लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. आतापर्यंत २२४ बेकायदा फलक जप्त करण्यात आले आहे. आता विनापरवाना फलक लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला.
‘फुटक्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने बेकायदा फलकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने विनापरवाना हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या फलकांमुळे शहरातील मुख्य मार्गांबरोबर सुशोभित केलेल्या चौकांचे विद्रुपीकरण होत होते तसेच रस्त्यांवरील झाडे, विद्युत खांबांवरही फलक लावण्यात आले होते. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने महापालिका क्षेत्रातील २२४ फलक जप्त करून ताब्यात घेतली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असून विनापरवाना डिजिटल जप्त करून संबंधितांकडून दंडात्मक वसुली केली जाईल, असा इशाराही रोकडे यांनी दिला.