शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सात पिस्तूलांसह काडतुसे, नशेच्या गोळ्या जप्त; सहा जणांना अटक, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:25 IST

सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत सात पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, ...

सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत सात पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, गांजा असा नऊ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.शांताराम बसवंत शिंदे (वय ३७, रा. आसंगी तुर्क, जत), सौरभ रवींद्र कुकडे (२४, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड, सांगली), राहुल सतीश माने (३०, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज), वैभव राजाराम आवळे (२५, रा. हडको काॅलनी, मिरज), सुरेश लक्ष्मण राठोड (४२, रा. आलियाबाद, विजयपूर, कर्नाटक), सुरेश संभाजी महापुरे (२५, रा. दिघंची, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अवैध शस्त्रे, अमली पदार्थ, नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सूचना केल्या. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी कारवाईसाठी सहायक निरीक्षक संदीप शिंदे व निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके नियुक्त केली होती.संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शांताराम शिंदे याने सौरभ कुकडे याला पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे दिल्याची माहिती मिळाली. पथकाने कुकडे व शिंदे या दोघांना छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या पार्किंगमध्ये ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आली. मिरजेतील मित्र राहुल माने याच्याकडून पिस्तूल घेऊन कुकडे याला दिल्याचे शिंदेने सांगितले.

पथकाने राहुल मानेचा शोध सुरू केला. तो मिरजेतील माजी सैनिक वसाहत येथे नशेच्या गोळ्या व गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून माने याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, दोन पिस्तूल, पाच काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, १२१८ ग्रॅम गांजा सापडला. त्याने नशेच्या गोळ्या मुंबईतील बच्चूभाई (रा. भायखळा) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी