अॅपेक्स कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांसह सात जणांवर गुन्हा, सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:26+5:302021-06-16T04:36:26+5:30
गांधी चौक पोलिसांनी भरत वेल्लाळ (रा. सांगली), गोकूळ विनायक राठोड (वय २३, रा. सांगली), बाळू उर्फ जानकीराम मारुती सावंत ...

अॅपेक्स कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांसह सात जणांवर गुन्हा, सहा जणांना अटक
गांधी चौक पोलिसांनी भरत वेल्लाळ (रा. सांगली), गोकूळ विनायक राठोड (वय २३, रा. सांगली), बाळू उर्फ जानकीराम मारुती सावंत (रा. गारपीर चौक, सांगली) व राजेंद्र म्हाळाप्पा ढगे (वय ३४, रा. कलानगर, सांगली) यांना अटक केली. प्रसन्न करंजकर व नरेंद्र जाधव या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. महेश जाधव यांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन दिला आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही डॉ. महेश जाधव याने अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णालय सुरू केले होते. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाऐवजी होमिओपॅथिक अभ्यासक्रमच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाइकांकडून भरमसाठ बिलांची आकारणी करून पैसे वसूल करण्यात येत हाेते. तसेच उपचाराची बिले देण्यास टाळाटाळ करण्यात येत हाेती. याबाबतच्या तक्रारी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. यामुळे या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास महापालिकेने प्रतिबंध केला होता. या आदेशाचे उल्लंघन करून रुग्णांवर उपचार सुरूच असल्याचे आढळल्याने महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.