तासगाव तालुक्यात दिवसात सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:58+5:302021-05-31T04:20:58+5:30
तासगाव : आरोग्य विभागाने रविवारी तासगाव तालुक्यात केलेल्या तपासणीत ३३ गावांत १२३ रुग्ण आढळून आले. रविवारी एका दिवसांत सात ...

तासगाव तालुक्यात दिवसात सात जणांचा मृत्यू
तासगाव : आरोग्य विभागाने रविवारी तासगाव तालुक्यात केलेल्या तपासणीत ३३ गावांत १२३ रुग्ण आढळून आले. रविवारी एका दिवसांत सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ३०३ इतकी झाली आहे.
तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोनोच्या आकडेवारीत घट होताना दिसून येत आहे. आरोग्य विभागाने रविवारी केलेल्या तपासणीत २५५ संशयितांचे नमुने घेतले होते. त्यापैकी १२३ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली, तरी कोरोनोने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण तासगाव तालुक्यात चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. रविवारी कोरोनाने सात रुग्णांचा मृत्यू झाला असून आज अखेर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३०३ इतकी आहे. तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या नऊ हजार ३०१ इतकी असून सात हजार ८०४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. ८७७ रुग्ण गृहविलगीकरणाअंतर्गत उपचार घेत आहेत. रविवारी १७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोना बाधित रुग्णांची गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे - तासगाव ३, अंजणी ७, बलगवडे ४, बिरणवाडी २, दहिवडी १, ढवळी १२, धुळगाव १, गव्हाण २, हातनूर ३, जरंडी १, कवठेएकंद ९, कौलगे १, कुमठे ३, लोकरेवाडी ४, मनेराजुरी ८, मांजर्डे २, नागेवाडी ६, नेहरूनगर १, निमणी १, पानमळेवाडी १, राजापूर १, सावळज ३, सावर्डे ९, सिद्धेवाडी ३, तुरची ७, उपळावी १, वडगाव ५, वज्रचौंडे १, वंजारवाडी १, वासुंबे ५, वायफळे ६, येळावी ८ आणि योगेवाडी १.