शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त; पंधरा दिवसांनी आला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:18 IST

सांगली : राज्याच्या अनेक भागांत कोरोनाच्या जेएन-१ विषाणूचे रुग्ण आढळत असताना, सांगली जिल्ह्यातही या विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. ...

सांगली : राज्याच्या अनेक भागांत कोरोनाच्या जेएन-१ विषाणूचे रुग्ण आढळत असताना, सांगली जिल्ह्यातही या विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. पंधरा दिवसांपूर्वी कोरोना संशयित आढळलेल्या १२ रुग्णांपैकी सात जण जेएन-१ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील पाच रुग्णांचा समावेश होता. पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेतून आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त झाला, परंतु जेएन-१ विषाणूचे सातही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली.गत महिन्यांपासून काही जिल्ह्यात कोरोनाचा नवा विषाणू जेएन - १ हा आढळून आला होता, परंतु सांगली जिल्ह्यात कोरोनाचे नियमित रुग्ण आढळले होते. दि. २० ते २७ डिसेंबर, २०२३ या दरम्यान १२ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले होते. आढळून आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सात रुग्णांचे नमुने कोविड १९ चा उपप्रकार शोधण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले होते.

त्याचा अहवाल सोमवार, दि. ८ रोजी राज्य कार्यालयाकडून प्राप्त झाला. सात रुग्णांमध्ये कोविड १९ या आजाराचा जेएन-१ या उपप्रकाराचा विषाणू असल्याचे असल्याचे आढळून आले. या सातपैकी सहा नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथून पाठविण्यात आले होते. त्यामध्ये पाच महापालिका क्षेत्रातील रुग्ण असून, एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे.

जेएन-१ विषाणूचे सहा रुग्ण ५० ते ८० या वयोगटांतील असून, एका रुग्णाला मधुमेह आहे. पाच रुग्ण घरीच किरकोळ उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर मध्यम स्वरूपाच्या लक्षणामुळे ८० वर्षांचा एक वृद्ध सांगली येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बरा झालेला आहे. ग्रामीण भागातील अजून एक रुग्ण कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या उपचाराकरिता दाखल झाला होता.

या रुग्णाचा नमुना उपप्रकारासाठी पाठविला असता, जेएन-१ हा उपप्रकार असल्याचे आढळून आले आहे. सातही रुग्ण सध्या उपचार घेऊन बरे झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून साथीच्या रोगाचा प्रसार झाला आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याने प्रशासनाने संशयित रुग्णांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या