मल्लिकार्जुन परिसरात निवाराशेडसाठी सात लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:07+5:302021-04-10T04:26:07+5:30

मल्लिकार्जुन मंदिर परिसरात प्रकाश एटम, मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी निवाराशेड उभारणी कामाची पाहणी केली. यावेळी सी. ...

Seven lakh sanctioned for shelter in Mallikarjun area | मल्लिकार्जुन परिसरात निवाराशेडसाठी सात लाख मंजूर

मल्लिकार्जुन परिसरात निवाराशेडसाठी सात लाख मंजूर

मल्लिकार्जुन मंदिर परिसरात प्रकाश एटम, मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी निवाराशेड उभारणी कामाची पाहणी केली. यावेळी सी. एच. पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : सांगली जिल्हा परिषदच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसरात भाविकांना निवाराशेड उभारणीसाठी जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम यांनी सात लाख रुपये निधी मंजूर करून आणला होता. त्याचे काम गतीने सुरू आहे. या कामाची पाहणी प्रकाश एटम, मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव, ज्येष्ठ मार्गदर्शक सी. एच. पाटील यांनी केली.

यावेळी संभाजी पाटील, दिलीप पाटील, सुभाष पाटील, सैनिक पाटील, दादासाहेब पाटील, विकास चौगुले, अविनाश वायदंडे, निरंजन जाधव, मोहन गुरव, नितीन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन देवस्थानच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्न करणे, भक्त निवास उभारणे, महिलांसाठी स्नानगृह बांधणे, मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे त्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Web Title: Seven lakh sanctioned for shelter in Mallikarjun area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.