जतमध्ये सात लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST2021-05-11T04:27:23+5:302021-05-11T04:27:23+5:30

संख : जत-बिळूर रस्त्यावर आशीर्वाद गार्डन येथे ७ लाख ६३ हजार २०० रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त ...

Seven lakh liquor seized in Jat | जतमध्ये सात लाखांचा मद्यसाठा जप्त

जतमध्ये सात लाखांचा मद्यसाठा जप्त

संख : जत-बिळूर रस्त्यावर आशीर्वाद गार्डन येथे ७ लाख ६३ हजार २०० रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. जत पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आशीर्वाद गार्डनचा मालक नीलेश भास्कर जाधव (रा. जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत ते बिळूर रोडवरील आशीर्वाद गार्डन येथे अवैध विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता आशीर्वाद गार्डनच्या उत्तरेस असलेल्या खोलीत ७ लाख ६३ हजार २०० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा सापडला.

पोलिस कॉन्स्टेबल सचिन जौंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशीर्वाद गार्डनचा मालक नीलेश भास्कर जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोपाल भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन जौंजाळ, प्रवीण पाटील, सचिन हाके, वहिदा मुजावर, संतोष खांडेकर, दत्ता लोखंडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Seven lakh liquor seized in Jat