शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे पैसे घालायचे खिशात, शिवशाहीच्या सात चालकांना ड्युटी बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:22 IST

सांगली ते स्वारगेट व मिरज ते स्वारगेट या प्रवासात विनातिकीट प्रवासी आणल्याचे निष्पन्न झाले

सांगली : प्रवाशांचे पैसे स्वत:च्या खिशात घालणाऱ्या शिवशाहीच्या सात चालकांना एसटी महामंडळाने ड्युटी बंदी केली आहे. पुण्यातील खासगी कंपनीचे हे चालक असून प्रवाशांना तिकीट न देताच वाहतूक केल्याचे आढळले आहे.एसटी महामंडळामार्फत काही शिवशाही गाड्या खासगी तत्वावर चालविल्या जातात. त्यामध्ये गाडी व चालक संबंधित खासगी कंपनीचा असतो. गाडी सुटतानाच स्थानकात प्रवाशांना तिकीटे दिली जातात. फक्त चालक प्रवासी घेऊन वाहतूक करतो. गाडीत वाहक नसतो. प्रवासादरम्यान मध्येच प्रवाशांना उतरविण्याची परवानगी आहे, पण नवे प्रवासी स्थानकातच घ्यावे लागतात.डिसेंबरमध्ये सांगली व मिरज आगारांतून पुण्याला धावणाऱ्या खासगी शिवशाही गाड्यांच्या तपासण्या महामंडळाच्या पथकाने केल्या, तेव्हा काही गाड्यांतील प्रवाशांकडे तिकिटे नसल्याचे आढळले. त्यांना विचारणा केली असता, चालकाने पैसे घेतल्याचे सांगितले. हे प्रवासी स्थानकात गाडीमध्ये चढले नव्हते, तर मध्येच हात दाखवून गाडी थांबविली होती.अशा सात चालकांनी सांगली ते स्वारगेट व मिरज ते स्वारगेट या प्रवासात विनातिकीट प्रवासी आणल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सांगली विभागीय कार्यालयाने संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस काढली आहे.बुधवारी (दि. १६) काढलेल्या नोटीशीत म्हंटले आहे की, यामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन झाली आहे. विनातिकीट प्रवासी आणल्याने आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे या सात चालकांना महामंडळाच्या कोणत्याही बसवर ड्युटीसाठी नियुक्त करु नये. तसे केल्यास, कंपनीवर कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला जाईल. नोटीशीमध्ये संबंधित सात चालकांची नावेही दिली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीShivshahiशिवशाहीPuneपुणे