कवठेमहांकाळ शहरात सुसज्ज कोविड सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:08+5:302021-04-25T04:27:08+5:30
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे. योग्य तेवढे कक्ष व बेड उपलब्ध नाहीत. तसेच रेमडेसिविर ...

कवठेमहांकाळ शहरात सुसज्ज कोविड सेंटर उभारा
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे. योग्य तेवढे कक्ष व बेड उपलब्ध नाहीत. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पाहता प्रशासनाने तत्काळ उपलब्धता करावी, अशी मागणी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा रिपाइंचे सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केली.
कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरची पहाणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, नगरसेवक लालासाहेब वाघमारे, विजयराव कांबळे आदींनी तहसीलदार बी. जे. गोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सतीश गडदे यांची भेट घेऊन चौकशी केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती भंडारे यांनी दिली.
यावेळी दिगंबर लोंढे, प्रा. बाळासाहेब कर्पे, दिनकर माने उपस्थित होते.