शिवाजी विद्यापीठ केंद्र कुपवाडला उभे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST2021-09-05T04:29:54+5:302021-09-05T04:29:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने व सांगली, मिरज ही दोन्ही मोठी शहरे जवळ ...

शिवाजी विद्यापीठ केंद्र कुपवाडला उभे करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने व सांगली, मिरज ही दोन्ही मोठी शहरे जवळ असल्याने कुपवाडमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र उभे करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कुलगुरूंकडे करण्यात आली.
कोल्हापूर येथे कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून संयुक्तपणे महानगरपालिका आहे. कुपवाड शहाराला स्वातंत्र्यसैनिक, कलावंत तसेच शिक्षणमहर्षींचा इतिहास लाभला आहे. सांगली व मिरज या दोन्हीही शहराच्या तुलनेत कुपवाडला दुय्यम स्थान दिलेले आहे. कुपवाड शहरातील विस्तारित भागात विविध शैक्षणिक व क्रीडा संकुलासाठी जागा आरक्षित आहे. आरक्षित भूखंड शासनाने ताब्यात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची निर्मिती करावी. कुपवाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहराच्या जवळच १ ते २ किलोमीटर अंतरावर जिल्हा न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासह सर्व प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे याचठिकाणी उपकेंद्र उभारणे सोयीचे ठरेल.
यावेळी आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उमर फारूक ककमरी, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, संजय गुदगे, प्रशांत वाघमारे, बाबासाहेब कांबळे, संजय कांबळे, कृष्णा भारतीय, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.