जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:53+5:302021-04-25T04:26:53+5:30

सांगली : जिल्हा परिषदेतील बहुतांशी कर्मचारी कोरोनामध्ये फ्रंटलाईनवर काम करीत आहेत. त्यांना कोरोना झाल्यानंतर वेळेत उपचार होत होत नाहीत. ...

Set up an independent Kovid Center for Zilla Parishad employees | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारा

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारा

सांगली : जिल्हा परिषदेतील बहुतांशी कर्मचारी कोरोनामध्ये फ्रंटलाईनवर काम करीत आहेत. त्यांना कोरोना झाल्यानंतर वेळेत उपचार होत होत नाहीत. काहींचे बळी गेले आहेत. शासनाने जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभे करावे, अशी मागणी कर्मचारी युनियनचे राज्य संपर्क प्रमुख बजरंग संकपाळ व सुभाष मरिगुद्दी यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले की, जिल्हा परिषद मुख्य इमारतीमधील शंभर कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित आले आहेत. काही कर्मचाऱ्यांचा यामध्ये बळी गेला आहे. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांवर तातडीने उपचार झाले पाहिजेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचेही उपचाराअभावी हाल होत आहे. कोरोनाबाधित झाले तर त्यांना वेळेवर रुग्णालयात बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे किमान तीस बेडचे अद्ययावत कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्याची गरज आहे.

Web Title: Set up an independent Kovid Center for Zilla Parishad employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.