जिल्ह्यातील सहा बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST2021-05-18T04:28:12+5:302021-05-18T04:28:12+5:30
बोरगाव : जिल्ह्यातील सहा बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. या जागांवर एमबीबीएस बंधपत्रित डाॅक्टरांची ...

जिल्ह्यातील सहा बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित
बोरगाव : जिल्ह्यातील सहा बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. या जागांवर एमबीबीएस बंधपत्रित डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. यापुढे ३५ डाॅक्टरांना अशाच पद्धतीने सेवेतून बाहेर रहावे लागणार असून, हा निर्णय रोखला नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएएमएस डाॅक्टरांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. कोरोनाने हाहाकार माजविला असताना या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा बजावली. त्याचा विसर पडून शासनाने सेवेतून कमी करून अन्याय केल्याचे मत यातील डाॅक्टरांनी व्यक्त केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत तिसऱ्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.
गेली दोन वर्षे या डाॅक्टरांनी अधिकारी म्हणून केले आहे. आता शासन यांची सेवा खंडित करत असेल तर त्यांनी करायचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी केलेले काम व सेवेतून बाहेर पडल्यावर येणारी वेळ यांचाही शासनाने विचार करावा. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.