शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:24 IST

series, Cinema Shooting : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मालिका आणि चित्रपटांची चित्रीकरणे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विशेषत: मराठी वाहिन्यांवरील मालिका व लो बजेट चित्रपटांची चित्रीकरणे सातत्याने कुठे ना कुठे सुरू असायची. कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्बंधांचे पालन करत छायाचित्रण सुरू राहिले होते. दुसऱ्या लाटेत निर्बंध कडक झाल्यानंतर निर्मात्यांनी गाशा गुंडाळला. गोवा, सिल्वासा, दिव, दमण आदी ठिकाणी स्थलांतर केले तेथे निर्बंध शिथील असल्याने तसेच निसर्गसौंदर्याची स्थळे भरपूर असल्याने चित्रीकरण सोयीचे ठरले.

चित्रीकरणासाठी आवडती डेस्टिनेशन्सकृष्णा आणि वारणा नद्यांचा परिसर, ऐतिहासिक वाडे, देखणे फार्म हाऊस, दंडोबाच्या डोंगररांगा, वाळवा तालुक्यात लांबच लांब पसरलेली फूलशेती ही काही डेस्टिनेशन्स निर्मात्यांना आकर्षित करायची. मिरजेतील कृष्णा घाटावर मालिका व गाण्यांच्या अल्बमची छायाचित्रणे व्हायची. मिरजेचे भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकारांच्या बेडग रस्त्यावरील देवी भवनमध्ये, तर सुमारे वर्षभरापासून एका मराठी मालिकेचे छायाचित्रण सुरू होते. औदुंबर येथील दत्त देवस्थान, अंकलीतील ऐतिहासिक वाडे, कवठेएकंद येथील सिद्धनाथ मंदिर, सांगलीत मिशन कंपाैंड, बावाफन दर्गा ही चित्रीकरण स्थळे निर्मात्यांच्या आवडीची होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarathiमराठीcinemaसिनेमा