मोबाईलचा गैरवापर करून अश्लील फोटो पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST2020-12-06T04:28:02+5:302020-12-06T04:28:02+5:30

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरातील महिलेचा मोबाईल चोरून त्यावरून त्यांच्या मैत्रिणींना अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविण्यात ...

Sent obscene photos by misusing mobile | मोबाईलचा गैरवापर करून अश्लील फोटो पाठवले

मोबाईलचा गैरवापर करून अश्लील फोटो पाठवले

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरातील महिलेचा मोबाईल चोरून त्यावरून त्यांच्या मैत्रिणींना अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मोनिका श्रीधर करंदीकर (रा. स्वयंभू साई अपार्टमेंट, स्फूर्ती चौक, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या करंदीकर स्फूर्ती चौक परिसरात राहतात. बुधवार, दि. २ रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून त्यांचा मोबाईल चोरून नेला. त्यानंतर अज्ञात चोरट्याने मोबईलमध्ये सेव्ह असलेल्या त्यांच्या मैत्रिणींना व्हॉटस-ॲपव्दारे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविण्यात आले. दुसऱ्यादिवशी दुपारी दीडच्या सुमारास अज्ञाताने हे कृत्य केले. त्यांच्या मैत्रिणींनी हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार त्यांनी चोरट्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करत साक्षीदार तपासले असून, सायबर शाखेकडून तांत्रिक माहिती घेऊन पुढील तपास केला जाणार आहे.

Web Title: Sent obscene photos by misusing mobile