ज्येष्ठ नागरिकांना दहा हजार रुपये सन्मान धन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:11+5:302021-02-05T07:20:11+5:30
इस्लामपूर : ज्येष्ठ नागरिकांना सन्मान धन म्हणून दहा हजार रुपये महागाई भत्त्याला जोडून मिळावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयासह कॅबिनेट ...

ज्येष्ठ नागरिकांना दहा हजार रुपये सन्मान धन मिळावे
इस्लामपूर : ज्येष्ठ नागरिकांना सन्मान धन म्हणून दहा हजार रुपये महागाई भत्त्याला जोडून मिळावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयासह कॅबिनेट मंत्री व स्वतंत्र बजेट मिळावे, ज्येष्ठांसाठी अॅट्रॉसिटीसारखा कायदा बनविण्यात यावा, अशा मागण्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी केल्या.
येथील पंचायत समितीच्या बचत धाममध्ये अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव अभियान मेळावा झाला. यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे -पाटील, कोल्हापूरचे पी. के. पाटील, डॉ. विजयकुमार स्वामी, सचिव गजानन पाटील, सल्लागार गोविंदराज परांजपे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मोरे म्हणाले, ज्येष्ठांसाठी वाहतूक संरक्षण कायदा, नागरी सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून शासनाने घोषित करावे.
पी. के. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबात येत चाललेला दुरावा दूर करण्यासाठी ज्येष्ठांना सन्मानधन मिळालेच पाहिजे. डॉ. स्वामी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. अॅड. किरण पाटील यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक सल्ला व सुविधा मोफत देणार असल्याचे सांगितले. डी. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
चंद्रशेखर मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनुप वाडेकर यांनी आभार मानले. यावेळी विजयराव लोंढे, हणमंतराव पाटील, आर. एन. मोहिते, नारायण सावंत, भगवान पाटील, रघुराज मेटकरी, हिंदुराव पवार, प्रवीण माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते.
फोटो - ०३०२२०२१-आयएसएलएम-ज्येष्ठ नागरिक न्यूज
इस्लामपूर येथे ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात जगन्नाथ मोरे-पाटील यांच्याहस्ते पी. के. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयराव लोंढे, अनुप वाडेकर, अॅड. किरण पाटील, आर. एन. मोहिते उपस्थित होते.