ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:17+5:302021-02-05T07:31:17+5:30
फोटो एडिटोरियलवर ३० सांगली ०२ फोटो ओळ - पॉल हॅरीस स्मृती ज्येष्ठ नागरिक दौडप्रसंगी ज्येष्ठांचा सत्कार पोलीस अधीक्षक दीक्षित ...

ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाची संपत्ती
फोटो एडिटोरियलवर ३० सांगली ०२ फोटो ओळ - पॉल हॅरीस स्मृती ज्येष्ठ नागरिक दौडप्रसंगी ज्येष्ठांचा सत्कार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी किशोर काळे, तानाजी बोराडे, प्रमोद चौगुले, राजेंद्र मेढेकर, प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलिसांसह समाजासमोर ज्येष्ठांचा आदर्श महत्वपूर्ण आहे. ज्येष्ठ नागरिक ही समाजाची संपत्ती आहे, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली व आभाळमाया फाऊंडेशन यांच्यावतीने रोटरीचे जनक पॉल हॅरीस यांच्या स्मृतिनिमित्त सलग चोविसाव्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी दौड आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक गेडाम यांच्या हस्ते या दौडची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक किशोर काळे उपस्थित होते. या स्पर्धेत ९३ वर्षे वयाच्या मालतीबाई जोशी, ८७ वर्षे वयाचे बी. डी. चौगुले, हेमलता चौगुले, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रंगराव शिंपुगडे यांच्यासह ४० ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खबरदारी घेऊन जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. ‘सर्वांसाठी पहिला नंबर’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येऊन या दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र व भेट म्हणून मास्क देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचे अध्यक्ष तानाजी बोराडे, आभाळमाया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनोद पाटील, राजेंद्र मेढेकर, सुरेश देशमुख, उदय कुलकर्णी, सुहास जनज, राजन राजोपाध्ये, प्रा. एम. एस. रजपूत, आर. डी. जाधव, श्रीकांत पाटील, संदीप नाईक उपस्थित होते.
आपला निसर्ग स्नेही