तासगावात नारायण राणेंविरोधात सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:30+5:302021-08-25T04:31:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी आक्षेपार्ह भाषेत टीका ...

तासगावात नारायण राणेंविरोधात सेनेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी तासगावमध्ये शिवसेनेच्यावतीने राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मार आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्हा उपप्रमुख अविनाश पाटील, जिल्हा उपसंघटक साहेबराव पाटील, शहरप्रमुख संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महिला तालुकाप्रमुख मनीषा पाटोळे, तालुका संघटिका शोभाताई पिसाळ, महिला शहरप्रमुख नंदाताई चव्हाण, लताताई कांबळे, रंजनाताई माळी यांच्यासह श्रीकृष्ण माळी, राजू मुल्ला, प्रशांत पाटील, केशव वाघमोडे, अमित सूर्यवंशी, दत्तात्रय चवदार यांच्यासह शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.