चिकुर्डेत दूध उत्पादकांचे चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:27 IST2021-05-12T04:27:22+5:302021-05-12T04:27:22+5:30

राजारामबापू दूध संघ, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट, लक्ष्मी दूध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र झाले. डाॅ. अशोक वरेकर यांनी मार्गदर्शन ...

Seminar on Milk Producers in Chikurda | चिकुर्डेत दूध उत्पादकांचे चर्चासत्र

चिकुर्डेत दूध उत्पादकांचे चर्चासत्र

राजारामबापू दूध संघ, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट, लक्ष्मी दूध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र झाले.

डाॅ. अशोक वरेकर यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मी दूध संस्थेला गाय व म्हैशीचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाश दत्तात्रय घोरपडे, रघुनाथ पवार, अक्षय पाटील, ममता पाटील, शिवाजी पाटील, काशिलिंग मलगुंडे, पृथ्वीराज मलगुंडे, दीपक शिंदे, कुबेर कदम, कोंडिबा अनुसे यांचा सत्कार राजारामबापू सूतगिरणीचे संचालक दिलीप खांबे, लक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. उपाध्यक्ष बसवेश्वर तोडकर, लक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष सिकंदर पठाण, उपाध्यक्ष निवास सिद्ध उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव संपत मलगुंडे, सूत्रसंचालन तानाजी खोत यांनी केले, तर आभार प्रताप पाटील यांनी मानले.

Web Title: Seminar on Milk Producers in Chikurda