आमदार खाडेंनी अतिक्रमण न काढल्यास आत्मदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:08+5:302021-05-22T04:25:08+5:30
निवेदनात दुर्योधन खाडे यांनी म्हटले आहे की, माझी गट नंबर ४८० मध्ये शेतजमीन आहे. आमदार खाडे हे जवळचे असल्याने ...

आमदार खाडेंनी अतिक्रमण न काढल्यास आत्मदहन
निवेदनात दुर्योधन खाडे यांनी म्हटले आहे की, माझी गट नंबर ४८० मध्ये शेतजमीन आहे. आमदार खाडे हे जवळचे असल्याने त्यांनी माझ्या शेतीत घर बांधले आहे. या घराकडे जाण्यासाठी पेड व मोराळे या गावांच्या सरहद्दीवरून जुना वहिवाटीचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे काम न करता त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणून माझ्या खासगी जागेतून रस्ता करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी आमदार खाडे शासनाच्या निधीचा गैरवापर करीत आहेत. ते शासकीय यंत्रणेवर दबाव आणून गैरवापर करीत आहेत. हा माझ्यावर अन्याय असल्याने त्यांनी रस्ता करण्याचा प्रयत्न केल्यास मी कोणत्याहीक्षणी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
खाडे यांनी निवेदनाच्या प्रति जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी मिरज, उपअभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती तासगाव, तहसीलदार तासगाव यांना दिल्या आहेत.