स्वत: घेतलेले ज्ञान शाश्वत असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:29+5:302021-02-08T04:23:29+5:30

संख : आपण स्वत: मिळवलेले ज्ञान सदैव शाश्वत असते. आई-वडिलांच्या संस्कारांना व कष्टांना विसरू नये. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे ...

Self-acquired knowledge is eternal | स्वत: घेतलेले ज्ञान शाश्वत असते

स्वत: घेतलेले ज्ञान शाश्वत असते

संख : आपण स्वत: मिळवलेले ज्ञान सदैव शाश्वत असते. आई-वडिलांच्या संस्कारांना व कष्टांना विसरू नये. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान प्रसाराचा वसा आणि वारसा सक्षमपणे वृत्तीने जतन करण्याचे काम प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे, असे मत प्रा. पी. आर. वाघमोडे यांनी केले.

जत येथील राजे रामराव महाविद्यालयात ‘ज्ञान शिदोरी’ कार्यक्रमांतर्गत ‘कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे - उत्तम प्रशासक’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी बोलत होते.

डॉ. ए. के. भोसले म्हणाले की, बापुजींनी सुरू केलेली ज्ञानाची गंगा समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे.

यावेळी गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. आर. कुलाळ, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एन.व्ही. मोरे, डॉ. बी. एम. डहाळके, प्रा. एच. डी. टोंगारे, डॉ. एम. बी. सज्जन आदींसह विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. एच. बोगुलवार यांनी प्रास्ताविक केली. प्रा. अतुल टिके यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. पी.जे. चौधरी यांनी आभार मानले.

Web Title: Self-acquired knowledge is eternal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.