प्रणाली भोळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST2021-07-18T04:19:10+5:302021-07-18T04:19:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील प्रणाली बापू भोळे यांची कृषी पदवीधर संघटनेच्या शिराळा तालुका ...

Selection of system naive | प्रणाली भोळे यांची निवड

प्रणाली भोळे यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील प्रणाली बापू भोळे यांची कृषी पदवीधर संघटनेच्या शिराळा तालुका युवती उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. कृषी पदवीधर संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंगल कडूस-पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

प्रणाली या कृषी पदवीधर असून, त्यांच्यावर संघटनेने तालुका युवती उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. कृषी पदवीधर ही संघटना पदवीधर विद्यार्थी, शेतकरी, कृषिसंबंधित प्रश्न सोडवून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते.

याकामी प्रणाली भोळे यांना संघटनेच्या अध्यक्षा मंगल कडूस-पाटील, महेश कडूस-पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षा नूतन जाधव, गुंजनताई कुरकुरे, वैदेही पाध्ये यांचे मार्गदर्शन लाभत आहे. संघटनेच्या माध्यमातून शिराळा तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचे भोळे यांनी सांगितले.

170721\img_20210717_150216.jpg

फोटो - प्रणाली भोळे

Web Title: Selection of system naive