शरद बंडगरची केंद्रीय पोलीस दलात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST2021-02-05T07:18:14+5:302021-02-05T07:18:14+5:30
इस्लामपूर : येथील यशोधन क्रीडा मंडळाचा खेळाडू शरद राजाराम बंडगर याची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत ...

शरद बंडगरची केंद्रीय पोलीस दलात निवड
इस्लामपूर : येथील यशोधन क्रीडा मंडळाचा खेळाडू शरद राजाराम बंडगर याची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने हे यश मिळवले आहे. तो उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आहे.
या निवडीबद्दल यशोधनचे संस्थापक, माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या हस्ते शरद बंडगरचा सत्कार करण्यात आला. त्याला प्रशिक्षक संतोष पाटील, राहुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी यशोधनचे अध्यक्ष विनायक जाधव, सुरेश ताटे, मानव गवंडी, वैभव पाटील, प्रशांत देसाई, दीपक जाधव, रणजित बाँगाने, उमेश मदने, अर्जुन पुजारी, राहुल खोत, पंकज पाटील उपस्थित होते.
फोटो : ३० इस्लामपुर १
ओळ : इस्लामपूर येथे शरद बंडगर याचा शिवाजी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विनायक जाधव, संतोष पाटील, राहुल जाधव, सुरेश ताटे, मानव गवंडी उपस्थित होते.