सावंतपुरची माॅडेल शाळेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:10+5:302021-03-19T04:26:10+5:30

पलूस : सावंतपूर येथील जिल्हा परिषद शाळेची माॅडेल शाळेसाठी निवड झाली आहे. माझी शाळा आदर्श शाळा विचारमंथनसाठी योगदान ...

Selection for Sawantpur Model School | सावंतपुरची माॅडेल शाळेसाठी निवड

सावंतपुरची माॅडेल शाळेसाठी निवड

पलूस : सावंतपूर येथील जिल्हा परिषद शाळेची माॅडेल शाळेसाठी निवड झाली आहे. माझी शाळा आदर्श शाळा विचारमंथनसाठी योगदान देण्याबाबत पुढाकार घेण्याचा निर्णय यानंतर घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पाटील यांनी शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जिल्ह्यात अशी उपक्रमशील शाळा घडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सभापती दीपक मोहिते, गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर, सरपंच मीनाक्षी सावंत, केंद्रप्रमुख किरण आमने, शाळा समितीचे अध्यक्ष धनंजय सावंत, मुख्याध्यापिका सुमन पाटील, संगीता आमणे, सर्व शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ सुतार यांनी केले तर मनीषा कोळी यांनी आभार मानले.

Web Title: Selection for Sawantpur Model School