सविता चव्हाण यांना ‘कोर्ट ऑफ दि टेबल’साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:52+5:302021-02-06T04:46:52+5:30

संपूर्ण जगात कोरोनाच्या बिकट पार्श्वभूमीवर सविता चव्हाण यांनी हे यश मिळविले आहे. संपूर्ण जगभरात एक टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक ...

Selection of Savita Chavan for 'Court of the Table' | सविता चव्हाण यांना ‘कोर्ट ऑफ दि टेबल’साठी निवड

सविता चव्हाण यांना ‘कोर्ट ऑफ दि टेबल’साठी निवड

संपूर्ण जगात कोरोनाच्या बिकट पार्श्वभूमीवर सविता चव्हाण यांनी हे यश मिळविले आहे. संपूर्ण जगभरात एक टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक सल्लागार या परिषदेस पात्र होतात. आयुर्विमा क्षेत्रांत दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर कालावधीत विशिष्ट व्यवसाय पूर्ण करणाऱ्या प्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड होते.

गतवर्षीही सविता चव्हाण यांची मिलियन डॉलर राऊड टेबल परिषदेस निवड झालेली होती. सविता चव्हाण या प्राचार्य पी. बी. चव्हाण यांच्या स्नुषा व तासगाव येथील आयकर, जी.एस.टी. सल्लागार अविनाश चव्हाण यांच्या पत्नी आहेत. गुंतवणूक सल्लागार म्हणून काम चालू केल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत सविता चव्हाण यांनी पहिल्या वर्षी मिलियन डॉलर राऊंड टेबल व दुसऱ्या वर्षी कोर्ट ऑफ दि टेबल हा बहुमान मिळविला आहे. गुंतवणूकदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल सविता चव्हाण यांनी आभार मानले. या यशात त्यांना खा. संजय पाटील, आ. सुमनताई पाटील, एचडीएफसी लाईफ उपाध्यक्ष प्रणव वाघमारे, अभिनंदन पाटील, नितीन पाटील, राजेंद्र मेढेकर, राम पाटील, प्रशांत साळुखे यांनी मार्गदर्शन केले.

फोटो-०४सविता चव्हाण

Web Title: Selection of Savita Chavan for 'Court of the Table'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.