संपतराव नरळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:36 IST2020-12-30T04:36:06+5:302020-12-30T04:36:06+5:30

ढालगाव : घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथील संपतराव नरळे यांची कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी ओ. बी. सी. सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात ...

Selection of Sampatrao Narale | संपतराव नरळे यांची निवड

संपतराव नरळे यांची निवड

ढालगाव : घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथील संपतराव नरळे यांची कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी ओ. बी. सी. सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण पातळीवर विस्तार होऊन पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी या निवडी केल्या आहेत. घोरपडी गावचे तरुण कार्यकर्ते संपतराव नरळे यांना राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र आमदार सुमनताई पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. युवा नेते रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष संजय कोळी, राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष अमर शिंदे, कवठेमहांकाळ शहराध्यक्ष महेश पाटील, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहन खोत, पदवीधर तालुका उपाध्यक्ष दादासाहेब नरळे, रमजान मुल्ला, धनाजी जाधव, देवाप्पा टोणे, प्रमोद कांबळे, अमोल खंडागळे, अशोक टोणे, सुरेश ठोंबरे, अक्षय शिंगाडे, राज पाटील यांच्यासह युवक उपस्थित होते.

Web Title: Selection of Sampatrao Narale