महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिराळ्यातील चाैघांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:54+5:302021-03-04T04:49:54+5:30
कोकरुड : पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती आणि गादी विभागातील विविध वजनी गटातून शिराळा तालुक्यातील चाैघांची निवड ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिराळ्यातील चाैघांची निवड
कोकरुड : पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती आणि गादी विभागातील विविध वजनी गटातून शिराळा तालुक्यातील चाैघांची निवड झाली. यातील दोघांची सलग तिसऱ्यावर्षी निवड झाली आहे.
सांगली येथे निवड चाचणीतून अमर पाटील (बिळाशी) याची सलग तिसऱ्यावर्षी निवड झाली आहे. यंदा त्याची ८६ किलो वजनी गटात गादी विभागात निवड झाली आहे. ७० किलो वजनी गटात गादी विभागात अनिकेत खबाले (खेड) याची निवड झाली आहे. माती विभागात सलग तिसऱ्यावर्षी प्रथमेश गुरव (शिराळे खुर्द) याची निवड झाली असून तो यावर्षी ७९ किलो वजनी गटातून उतरणार आहे. चिंचोली येथील मयूर जाधव हा ७० किलो वजनी गटात माती विभागातून जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
दरवर्षी चारपेक्षा जास्त मल्लांची महाराष्ट्र केसरीच्या विविध गटात सांगली जिल्ह्यातून निवड होण्याची परंपरा शिराळा तालुक्याने राखली असून निवड झालेल्या चारही मल्लांचे अभिनंदन होत आहे.
फोटो-१)०३अमर पाटील
२)०३मयूर जधव
३)०३प्रथमेश गुरव
४)०४अनिकेत खबाले