वाङ्मय प्रकल्प समितीवर अविनाश सप्रे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:44+5:302021-06-10T04:18:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वाङ्मय प्रकल्प समितीवर नियुक्त सदस्य म्हणून प्रा. अविनाश ...

वाङ्मय प्रकल्प समितीवर अविनाश सप्रे यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वाङ्मय प्रकल्प समितीवर नियुक्त सदस्य म्हणून प्रा. अविनाश सप्रे यांची निवड करण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे समितीचे अध्यक्ष असून, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नितीन रिंढे आणि नाटककार प्रेमानंद गज्वी अन्य सदस्य आहेत.
मंडळाकडे आलेल्या विविध वाङ्मयीन प्रकल्पांची चर्चा करून निर्णय घेणे, ग्रंथांना आर्थिक मदत देणे, मंडळाच्या वतीने महत्त्वाच्या विविध विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करणे, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या सदरामध्ये मान्यवरांची चरित्रे प्रकाशित करणे, जागतिक ग्रंथांचे अनुवाद प्रकाशित करणे अशी महत्त्वाची कामे या समितीमार्फत केली जातात. प्रा. सप्रे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ‘भारतीय भाषा आणि साहित्य’ या विभागाचे समन्वयक संपादक म्हणूनही कार्यरत आहेत.