कोतीज येथील अधिकराव जगताप यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:36+5:302021-07-07T04:33:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क - विटा : महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ. फेडरेशनच्या प्रदेश चिटणीसपदी कोतीज (ता. कडेगाव) येथील अधिकराव बाळासाहेब जगताप ...

कोतीज येथील अधिकराव जगताप यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क -
विटा : महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ. फेडरेशनच्या प्रदेश चिटणीसपदी कोतीज (ता. कडेगाव) येथील अधिकराव बाळासाहेब जगताप यांची निवड झाली. राज्यात सामाजिक काम करणाऱ्या आठ लाख सामाजिक संस्थांची एन.जी.ओ. फेडरेशन ही शिखर संस्था आहे.
जगताप यांनी पुणे येथील आरोही फौंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीमाल प्रक्रिया, उद्योग, एनजीओ सक्षमीकरण, महिला बचत गट सक्षमीकरण, आदींच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची एनजीओ फेडरेशन या शिखर संस्थेच्या प्रदेश चिटणीसपदावर निवड करण्यात आली. या निवडीनंतर जगताप यांनी एनजीओच्या समस्या राज्य शासनापर्यंत मांडून संस्थांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणार असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एनजीओचे बळकटीकरण करणार असल्याचे सांगितले.