आरआयटीच्या ४५ विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST2021-06-24T04:18:34+5:302021-06-24T04:18:34+5:30

इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागामधील बी. टेक. शेवटच्या वर्षातील ४५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे ...

Selection of 45 RIT students in reputed companies | आरआयटीच्या ४५ विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांमध्ये निवड

आरआयटीच्या ४५ विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांमध्ये निवड

इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागामधील बी. टेक. शेवटच्या वर्षातील ४५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली. तसेच जी. आर. ई. गेट यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्येदेखील विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले.

विभागप्रमुख डॉ. एम. एस. पाटील म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली आहेत. मात्र आरआयटीमध्ये सर्व शैक्षणिक उपक्रम ऑनलाइन पद्धतीने गेल्या मार्च महिन्यापासून चालू आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. प्रभंजन मोरे, विभागप्रमुख डॉ. एम. एस. पाटील, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. अभिजित शहा यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, सचिव प्रा. आर. डी. सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Selection of 45 RIT students in reputed companies