महाडिक पॉलिटेक्निकच्या ३९ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:43+5:302021-08-17T04:31:43+5:30
इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील अंतिम वर्षाच्या ३९ विद्यार्थ्यांची ...

महाडिक पॉलिटेक्निकच्या ३९ विद्यार्थ्यांची निवड
इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील अंतिम वर्षाच्या ३९ विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित कंपनीने ऑनलाईन कॅम्पस मुलाखतीमधून निवड केली.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव राहुल महाडिक व उपाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी अभिनंदन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जवळपास १.४४ लाख इतके वार्षिक पॅकेज मिळणार आहे. यावर्षी ट्रेनिंग व प्लेसमेंटच्या माध्यमातून एकूण १३६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
महाविद्यालयामध्ये दरवर्षी विविध कंपन्यांद्वारे अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते व याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळावी यादृष्टीने महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. जुबेर मुल्ला, उपप्राचार्य प्रा. सी. बी. पाटील, प्रा. विनोद कापसे यांचे मार्गदर्शन लाभले.