वसंतदादा अभियांत्रिकीमधील १३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:51+5:302021-01-03T04:28:51+5:30

महाविद्यालयांच्या पदवी आय टी, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल व इंस्टरमेटेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डाईव्हसाठी ...

Selection of 13 students in Vasantdada Engineering | वसंतदादा अभियांत्रिकीमधील १३ विद्यार्थ्यांची निवड

वसंतदादा अभियांत्रिकीमधील १३ विद्यार्थ्यांची निवड

महाविद्यालयांच्या पदवी आय टी, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल व इंस्टरमेटेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डाईव्हसाठी सहभाग घेतला होता. या संपूर्ण निवड प्रक्रियेतून टीसीएस कंपनीकडून मेकॅनिकल विभागातील मंगेश विजयकुमार माळी, ओंकार अशोक तोडकर व प्रज्ज्वल कुलकर्णी, आय टी विभागातील मंगेश राजीव खोंद्रे, शुभम श्रीकांत घोडके, चिन्मय मिलिंद नवले, सुमित प्रताप जाधव व मोहिनी राजेंद्र कटोरे. इलेक्ट्रिकल विभागातील सौरभ सदाशिव पाटील व शुभम रमेश कांबळे, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रतीक्षा जनगोँडा पाटील व आदित्य अरविंद जोशी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील श्रद्धा प्रशांत कोकणे या विद्यार्थ्यांची निवड करून ऑफर लेटर देण्यात आले.

विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष पी. एल. रजपूत, सचिव आदिनाथ मगदूम यांचे प्रोत्साहन व प्राचार्य डॉ. डी. व्ही घेवडे, प्रा. अरिफ बुकसेलर आणि सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of 13 students in Vasantdada Engineering