महाडिक पॉलिटेक्निकच्या १२३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:16+5:302021-07-17T04:22:16+5:30

इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ...

Selection of 123 students of Mahadik Polytechnic | महाडिक पॉलिटेक्निकच्या १२३ विद्यार्थ्यांची निवड

महाडिक पॉलिटेक्निकच्या १२३ विद्यार्थ्यांची निवड

इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीमधून १२३ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली.

या कंपन्यांकडून १४८ विद्यार्थ्यांची मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यातील १२३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव राहुल महाडिक व उपाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी अभिनंदन केले.

कोल्हापूर आणि पुणे परिसरातील विविध कंपन्यांमध्ये हे विद्यार्थी रूजू होणार आहेत. त्यांना जवळपास १ लाख ४४ हजार ते २ लाखापर्यंत वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

महाविद्यालयामध्ये दरवर्षी विविध कंपन्यांद्वारे अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले जाते व याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळावी, यादृष्टीने महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते.

या विद्यार्थ्यांसाठी रुबिकॉन स्कील डेव्हलपमेंटच्या माध्यमातून १५ दिवसांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे प्रशिक्षण घेण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. जुबेर मुल्ला, उपप्राचार्य प्रा. सी. बी. पाटील व प्रा. विनोद कापसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of 123 students of Mahadik Polytechnic