शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्यासह सव्वा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:37 IST

Tobacco Ban Sangli- सुगंधी तंबाखूजन्य पदार्थासह गुटख्याची बेकायदेशीर वाहतुक करून त्याची विक्री करणाऱ्या माधवनगर (जि. सांगली) येथील दोघांना पोलीसांनी अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातील ६ लाख रूपये किंमतीची स्कार्पिओ व ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा सुगंधी पानमसाला व गुटखा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देगुटख्यासह सव्वा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त विटा पोलीसांची कारवाई : माधवनगरच्या दोघांना अटक

विटा : सुगंधी तंबाखूजन्य पदार्थासह गुटख्याची बेकायदेशीर वाहतुक करून त्याची विक्री करणाऱ्या माधवनगर (जि. सांगली) येथील दोघांना पोलीसांनी अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातील ६ लाख रूपये किंमतीची स्कार्पिओ व ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा सुगंधी पानमसाला व गुटखा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास विटा पोलीसांनी येथील शिवाजी चौकात कारवाई केली. याप्रकरणी प्रमोद उर्फ रोहित महादेव तहसीलदार (२०, रा. सदलगा, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, सध्या रा. तात्यासाहेब मळा, माधनवगर) व तानाजी वसंत शिंदे (४१, रा. तळेवाडी-करगणी, ता.आटपाडी, सध्या रा. माधवनगर, सांगली) या दोघांना अटक केली.गुटख्यासारख्या प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री करण्यास मनाई असताना माधवनगर येथील संशयित तहसीलदार व शिंदे हे दोघेजण शुक्रवारी पहाटे ४ वाजता स्कार्पिओ गाडीतून (क्र. एम.एच.-१०-बीए-११४४) मधून गुटखा, केसरयुक्त विमल पान मसाला,सॅफरन ब्लेंडेड, आरएमडी यासह अन्य गुटखा विक्रीसाठी घेऊन विट्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना मिळाल्यानंतर उपअधिक्षक अकुंश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली.त्यावेळी पहाटे सव्वा चार वाजता स्कार्पिओ गाडी येताच पोलीसांनी ती थांबवून झडती घेतली असता गाडीत ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा सापडला. त्यामुळे पोलीसांनी ६ लाख रूपयांची गाडी व ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रमोद उर्फ रोहित तहसीलदार व तानाजी शिंदे या दोघांना अटक केली.विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम. टी. मल्याळकर, सुजीत देवराय, अमर सूर्यवंशी, नवनाथ देवकाते, पुंडलिक कुंभार, अभिजीत वाघमोडे, रवींद्र पवार, गणेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीCrime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस