शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ते अनधिकृत बांधकाम पाहून सांगलीतील हमालांनी मारला रस्त्यावरच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:44 IST

येथील मार्केट यार्डातील रस्त्यावरच सुरु असलेले बांधकाम शुक्रवारी हमाल बांधवांनी रोखले. कामास अडथळा ठरणारे हे बांधकाम जोवर बंद होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा हमालांनी दिला. अखेर

ठळक मुद्देसभापतींकडून काम थांबविण्याचे आदेश

सांगली : येथील मार्केट यार्डातील रस्त्यावरच सुरु असलेले बांधकाम शुक्रवारी हमाल बांधवांनी रोखले. कामास अडथळा ठरणारे हे बांधकाम जोवर बंद होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा हमालांनी दिला. अखेर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी संबंधितांना बांधकाम थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर हमालांनी आंदोलन मागे घेतले.

मार्केट यार्डात बाजार समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्याशेजारी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम होत असल्याचे शुक्रवारी सकाळी हमाल बांधवांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम आणि बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरूवात करण्यात आली. बांधकाम होत असलेला भाग बाजार समितीच्या मालकीचा आहे.

हे बांधकाम झाल्यास हमालांना गाडीत मालाची उतार करण्यास व चढविण्यास अडचणी येणार आहेत. यामुळे संतप्त हमालांनी अचानक काम बंद आंदोलन केले. बाजार समितीच्या बाहेर ठिय्या मारला होता. जोवर बांधकामावर कारवाई होत नाही, तोवर आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. हमाल बांधवांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बाजार समिती प्रशासनाने तोडगा काढला. मुख्य रस्त्यावर अनेक व्यापाºयांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हमाल बांधवांना अडचणी येत असल्याने हे अतिक्रमणही काढावे, अशी मागणी केली. शुक्रवारी काम बंद राहिले असले तरी, शनिवारपासून पूर्ववत कामकाज सुरू होणार आहे.हळद, गुळाचे सौदे बंदबांधकामाच्या विरोधात हमाल बांधवांनी काम बंद ठेवल्याने शुक्रवारी हळद, गुळाचे सौदे बंद होते. बाजार समितीच्या प्रशासनाने सायंकाळी सर्वांशी चर्चा करून तोडगा काढला. चर्चेनंतर रस्त्यावर सुरू असलेले बांधकाम थांबविण्याचे आदेश सभापतींनी दिले. संबंधित व्यापाºयांनीही बांधकाम करणार नसल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी सभापती दिनकर पाटील, सचिव एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :SangliसांगलीMarket Yardमार्केट यार्डStrikeसंप