रासायनिक, जैविक बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:23+5:302021-06-03T04:19:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : पेरणी करताना प्रथम रासायनिक व नंतर जैविक बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावी. भरपूर ...

रासायनिक, जैविक बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणी करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : पेरणी करताना प्रथम रासायनिक व नंतर जैविक बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावी. भरपूर ओलावा असताना पेरणी करावी़, असे आवाहन कृषी सहायक एस. एस. कोटी यांनी केले.
बेळोंडगी (ता. जत) येथे खरीप हंगाम बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक कार्यक्रमात एस. एस. कोटी बोलत होते. ते म्हणाले, बियाणे विकत घेताना पक्के बिल घ्यावे. बियाणे पेरणी केल्यानंतर पाकिटात थोडे बियाणे ठेवावे. भविष्यात बियाण्याची उगवण झाली नाही तर कंपनीविरोधात तक्रार करता येते. खरीप हंगामातील बाजरी, तूर, मूग या बियाण्यांची पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया कशी करावी, याविषयीही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कोटी म्हणाले की, खरीप हंगामात कर्नाटकातील धारवाड कृषी विद्यापीठाकडून भुईमूग बियाण्याचा बीजोत्पादन कार्यक्रम १० हेक्टर क्षेत्रावरती घेणार आहे. प्रथम लाभार्थी शेतकऱ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी शेतकरी श्रीशैल कोळी, शांताप्पा बासरगाव, काशीनाथ सुतार, सिद्धाण्णा हत्तळी, महादेव मणूर, प्रकाश हलकुडे, विठ्ठल भंडरकवठे उपस्थित होते.