हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 PM2021-04-22T16:12:24+5:302021-04-22T16:40:20+5:30

Teacher Sangli : जिल्हातील शिक्षणाधिकारी व पे युनिट अधिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे एप्रिल महीना संपत आला तरी माधामिक शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे पगार अदयाप झालेले नाहीत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुधाकर माने यांनी केला आहे.

Secondary teacher's salary extended due to negligence |  हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवर

 हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवर

Next
ठळक मुद्दे हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवरशिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांचा आरोप

संजयनगर/सांगली : जिल्हातील शिक्षणाधिकारी व पे युनिट अधिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे एप्रिल महीना संपत आला तरी माधामिक शाळातील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे पगार अदयाप झालेले नाहीत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुधाकर माने यांनी केला आहे.

शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे सांगली जिल्हातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ऐन पाडवा, रामनवमी आणि रमजान महिना सूरू असून सणाच्या काळात शिक्षकांना पगाराविना दिवस काढावे लागत आहे. अनेक शिक्षक कोरोना ड्युटी करत आहेत.अनेकजण कोरोनाबाधित आहेत, आणि उपचार घेत आहेत. कांहीजण होम कोरंटाईन झाले आहेत, अशा बिकट परिस्थितीत हे शिक्षक पगाराविना मानसिक ददडपणाखाली जगत आहेत. कर्जावरचे व्याज न भरल्याने अनेकांना दंड भरावा लागत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप माने यांनी केला आहे. 

शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु भगिनी यांच्या सहनशक्तीचा अंत न पहाता कार्यालयाने आपल्या कामात सुधारणा करावी आणि शिक्षकांचे पगार वेळेत महिन्याच्या एक तारखेस करावेत, अशी मागणी डॉ. आशिष यमगर, संजय पवार, रतन कुंभार, अरीफ गोलंदाज, सुरेश सपकाळ, बाजीराव जाधव, देवेंद्र पाटील, सुरेश कदम, किशोर वाघमारे, शहाजी खरमाटे, प्रविण पवार, दिपक सपकाळ, संतोष चौगुले, दिपक पाटील, तानाजी पवार, मुरारी माने, दिपक चौधरी या शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


एप्रिल महिन्याची २२ तारीख उलटून गेली तरी अदयाप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग व वित्त विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिल नाकारली आहेत. या बाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिले आहे, परंतू अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
-सुभाष मोरे, 
राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक भारती.

Web Title: Secondary teacher's salary extended due to negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.