मिरजेत चुरशीने मतदान
By Admin | Updated: August 9, 2015 00:47 IST2015-08-09T00:33:18+5:302015-08-09T00:47:25+5:30
बाजार समिती : नेत्यांच्या केंद्रांना भेटी

मिरजेत चुरशीने मतदान
मिरज : बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी मिरजेत चुरशीने ९५ टक्के मतदान झाले. खा. संजय पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, मदन पाटील, विशाल पाटील यांनी मतदान केंद्राला भेट दिली.
बाजार समिती निवडणुकीसाठी मिरज हायस्कूल मतदान केंद्रावर उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होती. मतदारांना नेण्या-आणण्यासाठी उमेदवार व समर्थकांची धावपळ सुरू होती. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, माजी आमदार विलासराव शिंदे, खंडेराव जगताप, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, गजेंद्र कुळ्ळोळी, अण्णासाहेब कुरणे मतदान केंद्राजवळ तळ ठोकून होते. माजी मंत्री मदन पाटील कार्यकर्त्यांसोबत कट्ट्यावर बसून होते. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
एकूण मतदान पुढीलप्रमाणे - सहकारी संस्था गट - मिरज- ८२६, कवठेमहांकाळ - ८२४, जत - ९७९, एकूण २६२९. ग्रामपंचायत गट - मिरज - ७२२, कवठेमहांकाळ- ५२३, जत - ९६७, एकूण -२२१२. व्यापारी गट - सांगली - ९२२, मिरज- ८३, कवठेमहांकाळ - २९, जत- ६७, एकूण -११०१. हमाल तोलाईदार गट - सांगली -१४७१, मिरज- २, कवठेमहांकाळ - १४, जत- ६८, एकूण - १५५५. प्रक्रिया संस्था गट - सांगली -२२३, मिरज- २७, कवठेमहांकाळ - ६६, जत- ४२, एकूण - ३५८. (वार्ताहर)छायाचित्र काढताना एकजण ताब्यात
मतदान करताना छायाचित्र काढल्याबद्दल बेडग येथील एका पदाधिकाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदानानंतर त्यास सोडून देण्यात आले.
मिरजेत झालेले मतदान पुढीलप्रमाणे - सहकारी संस्था- ८३९ पैकी ८२६, ग्रामपंचायत- ७३६ पैकी ७२२, व्यापारी- ८८ पैकी ८३, हमाल- २ पैकी २, प्रक्रिया- ३० पैकी २७.