शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगावात येरळेतून दाम्पत्य गेले वाहून, एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:17 IST

तासगाव : येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक ...

तासगाव : येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक वृद्ध जोडपे दुचाकीसह वाहून गेले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’ चे पथक शोध घेण्यासाठी दाखल झाले. मात्र शोध लागला नाही. दरम्यान, वाहून गेलेल्या जोडप्याची नेमकी ओळख समजू शकलेली नाही.मागील चार दिवसांपासून तालुक्यात आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येरळा नदीचे पात्र भरून वाहत आहे. जुना सातारा रस्त्यावरील तासगाव ते तुरचीच्या दरम्यान पुलावर चार दिवसांपासून दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत आहे. प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र काही नागरिक त्यातूनही वाट काढून पुलावरून ये-जा करत होते.

सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तासगावहून तुरचीच्या दिशेने एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात होते. या पुलावरून जात असताना तिथे उभ्या असणाऱ्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जाऊ नका, अशी विनंती केली होती. मात्र त्यातूनही हे जोडपे पाण्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह वाढला. पुलावरून ते नदीपात्रात पडले आणि वाहून गेले.या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. पथकाने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र, शोध लागला नाही. सायंकाळी ही शोध मोहीम थांबवण्यात आली. वाहून गेलेले जोडपे नेमके कोण आहे, याची माहिती अद्याप लागलेली नाही. तासगाव पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणे