पाेलिसांच्या तत्परतेमुळे बेपत्ता मुलीचा शाेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:40+5:302021-01-03T04:28:40+5:30

माडग्याळ : कुटुंबीय रागावल्याने बनहट्टी (कर्नाटक) येथून घरातून निघून गुड्डापूर (ता. जत) येथे आलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी ...

Search for missing girl due to police promptness | पाेलिसांच्या तत्परतेमुळे बेपत्ता मुलीचा शाेध

पाेलिसांच्या तत्परतेमुळे बेपत्ता मुलीचा शाेध

माडग्याळ : कुटुंबीय रागावल्याने बनहट्टी (कर्नाटक) येथून घरातून निघून गुड्डापूर (ता. जत) येथे आलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

बनहट्टी येथील १५ वर्षांची मुलगी घरात किरकोळ वाद झाल्याने कोणालाही न सांगता शुक्रवारी घराबाहेर पडली. ती चालत गुड्डापूर, व्हसपेट, माडग्याळ परिसरात फिरत होती. सुरुवातीला तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. दरम्यान, रागाच्या भरात मुलगी घरातून निघून गेल्याने कुटुंबीय तिचा शाेध घेत हाेते. पाेलिसांत तक्रारही दिली. संबंधित मुलीबाबत माडग्याळ औटपाेस्टलाही माहिती देण्यात आली. पोलीस नाईक बन्नेनवर, विक्रम गोदे, वसंत सावंत, गुरसिद्ध माळी, आदींनी मुलीचा शोध घेतला असता ती माडग्याळपासून एक किलाेमीटर अंतरावरील खंडोबा मंदिराजवळ एकटीच थांबली होती. तेथील पुजाऱ्यांनी तिची विचारपूस करून पोलिसांना माहिती दिली. पथकाने तत्काळ परिसरात जाऊन मुलीस ताब्यात घेतले. नातेवाइकांना बोलावून घेऊन तिला त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

Web Title: Search for missing girl due to police promptness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.